Wednesday, April 14, 2010

५. सावधान धर्माचे राज्य येणार आहे! भाग-१ ला

राजमान्य राजर्षी श्रीयुत चार्लस डार्वीन या महान आत्म्याने मांडलेला उत्क्रांतीवाद आता सर्वमान्य झालेला असला तरी मानव हा माकड जातीपासूनच उत्क्रांत झालेला आहे यावर आजून सर्व विचारवंतांचे एकमत झालेले नाही. एवढेच काय स्वत: डार्वीन हे देखील मानव उत्क्रांतीच्या बाबतीत सांशकच आहेत.
काही संशोधकांच्या (आणि माझ्या) मते मानव म्हणजे माकडाची "संकरीत" आव्रुती आहे. हे संकरण काही बाह्य शक्तींच्या द्वारे झाले असण्याची शक्यता आहे. त्यांना आपल्याकडे देव असे म्हणतात. पौराणिक काळात हे देव प्रुथ्वीवर आले आणि त्यानी माकडापासून मानव निर्मित केला. त्या मानवाने या देवांच्या साहाय्यानेच खुप विलक्षण अशा कलाक्रुती उभा केल्या असाव्यात. नाहीतर पिरामीडस, इंका राज्याची निर्मीती आत्ताच्या मानवाला ज्याला आपण सर्वात आव्रुत (उत्क्रांत) मानतो त्याला आजच्या काळातही शक्य नाहीत. रामायणात आढळणारे माकड, मानव व राक्षस यांची वर्णने ही याच गोष्टींचीच साक्ष देतात. रामायणाच्या काळात कदाचीत माकड (अर्धसंकरीत) मानव(संकरीत) व राक्षस (अतिसंकरीत) अवस्थेत एकाच कालखंडात अस्तित्वात असावीत.
आज जगाच्या पाठीवर जी जी म्हणून अजस्त्र, विस्मयकारक वास्तूशिल्पे आढळतात ती सर्व त्या काळात अस्तित्वात असणार्या अतिसंकरीत अशा राक्षसांच्या हातून निर्माण झाली असावित. आजही आपल्याकडे अशाप्रकारच्या अख्यायिका ऐकायला मिळतात की कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदीर हे राक्षसांनी एका रात्रीत बांधून पूर्ण केले इ.इ.
आपले मानव निर्मीतीचे कार्य पूर्ण झाल्यावर देव परत आपल्या मूळ स्थानी परतला असावा. ते स्थान अंतराळात कोठेतरी असावे त्याला आपण स्वर्ग, देवाची नगरी असे मानतो. इकडे काळाच्या ओघात राक्षस प्रकारातील व अर्धसंकरीत अशा हनुमान प्रकारातील मानवाचा र्हास झाला असावा.
फक्त संकरीत असा मानव प्राणी उरला आणि यापूढे तोच आपल्या अभ्यासाचा विषय असेल

1 comment:

  1. Thodkyat Hitler ne Germanshaferd Jat tayar keli,Tas Devani Manav tayar kela asava.
    Tumcha vachun as vatla ki,Germanshaferd tayar kela tari gavti jat ajhe ahe.Tyacha pramane makda he aj ahet.
    Makdapasun manav zala, tar magha ajun makda ka ahet!? ha prashna ata evda tras denar nahi mala.


    Pratapsinh Gaikwad

    ReplyDelete

प्रतिक्रिया