Thursday, October 07, 2010

२८. लोभी कुत्र्याची गोष्ट आणि आपण

इयत्ता पाचवी-सहावीमध्ये असताना आपल्याला मराठी विषयाच्या पेपरमध्ये शेवटी निबंध लेखन, गद्य आकलन असे प्रश्न असायचे. त्यामध्येच आणखी एक प्रश्न म्हणजे दिलेल्या अपुर्ण वाक्यांवर अधारीत कथा लिहायची आणि त्या कथेला योग्य नाव द्यायचे. त्याप्रकारात सर्वात जास्तवेळा "लोभी कुत्रा" नावाची कथा मी लिहील्याचे आठवते. ती कथा साधारणपणे अशी होती.
एक कुत्रा आपल्या तोंडात भाकरी घेउन रस्त्याने जात असतो. वाटेत त्याला एक नदी किंवा ओढा लागतो. त्या नदीच्या पाण्यात त्या कुत्र्याला आपले प्रतिबिंब दिसते. प्रतिबिंबामध्ये दिसणा-या कुत्र्याच्या तोंडातील भाकरी आपल्याला मिळावी असा लोभ त्या कुत्र्याला होतो आणि तो भुंकू लागतो. भुंकताना त्याच्या तोंडातील भाकरी पाण्यात पडते व त्याला भाकरीशिवाय रहावे लागते.
अशाप्रकारे लोभापायी त्या कुत्र्याचे नुकसान होते.
पुढे त्या कुत्र्याला पश्चाताप होतो अशी ओळ बहुदा त्यावेळी कुणाला सुचली नसती.
ही कथा आपण सर्वांनी कधी ना कधी, कुठे ना कुठे ऐकली वा वाचली असेल व आपण त्या कुत्र्याच्या लोभीपणामुळे त्या कुत्र्याबद्दल वाईट मत बनवले असेल.
पण मला असे वाटते की बोलून चालून तो एक कुत्राच होता आणि ही गोष्ट प्रत्यक्षात घडली असेलच असे नाही. आपण त्या कुत्र्याच्या नावाने ही कथा लिहितो आणि पुन्ह:पुन्हा वाचतो, सांगतो. पण त्यात त्या कुत्र्याबद्दल वाईट मत करण्याचे किंवा त्याला लोभी म्हणणे चुकीचे आहे असे मला वाटते.
भाकरी पाण्यात पडल्यावर त्या कुत्र्याला त्याचा पश्चाताप होईल की नाही हे माहीत नाही पण आपल्याकडून असे घडले असते तर आपल्याला पश्चाताप नक्कीच झाला असता. तेव्हा ही कथा पुन्हा पुन्हा सांगून आपण आपले भाकरीवरचे प्रेम किंवा लोभच दर्शवीत असतो.
ही कथा ज्याने लिहीली तोच एक नंबरचा लोभी असावा आणि त्यातही त्याने आपला लोभीपणा लपविण्यासाठी कुत्र्याला बळीचा बकरा बनविले आहे ते वेगळेच.
भाकरी पाण्यात पडल्याचे दु:ख ज्याला होते तोसुधा लोभीच असणार, नाही का?
भाकरी पाण्यात पडल्यावर वाईट आपल्याला वाटते व लोभी असे विशेषन आपण कुत्र्याला लावतो. फारतर वेंधळा कुत्रा, धांदरट कुत्रा असे म्हटले असते तर जरा जास्त बरे झाले असते.
बघा पटतय का?

3 comments:

  1. Namaskar
    Simple story
    Good morel
    Jo samajala to shahana.
    Bhagwan
    ( My Blog in Marathi.
    http://bhagwanagapurkar.wordpress.com/ )

    ReplyDelete
  2. प्रदिप,

    कितीतरी वेळा गोष्ट वाचून/ऐकून पण तुम्हाला समजलेली वाटत नाही.

    गोष्ट साधी सोप्पी असली तरी मतितार्थ घ्यावा. आणि प्राण्यांवर बेतलेल्या ब-याच गोष्टी या मुलांना सोप्या आणि मनोरंजक आणि उद्बोधक वाटाव्यात म्हणुन तश्या असतात. मुलांसाठीच्या पंचतंत्राची रचना याच विचारतून झाली आहे(पंचतंत्रातील ब-याच गोष्टी प्राण्यांना केंद्रस्थानी ठेउन रचलेल्या आहेत).

    कुत्रा लोभी होता की नाही, याबद्दल मला वाद घालायचा नाहिये, पण 'क्षणिक लोभाने आहे ते गमावून बसण्यापेक्षा सारासार विचार करुन निर्णय घ्यावा' असे ले़खकास सुचवायचे आहे.

    त्यामुळे या साध्या पण अत्यंत उपयोगी सल्ल्याबद्द्ल त्यांना लोभी म्हणणे, चुकीचे आहे.

    ---प्रिया.

    ReplyDelete

प्रतिक्रिया