Thursday, April 22, 2010

६. सावधान धर्माचे राज्य येणार आहे! भाग-२

महोदय कौलिन विल्यम्स यानी आपल्या ’दी आउटसायडर’ या आपल्या विचारग्रंथात उधृत केले आहे की प्रत्तेक मानसाच्या आत एक माकड लपलेले आहे. हे माकड नेहमी अत्रुप्त असते आणि आपल्या नैसर्गीक इच्छा पूर्ण करण्यात मग्न असते. मला वाटते की हे माकड म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातील नातेसंबंधाचा पुरावाच आहे. माणसाने वरून कितीही नैतिकतेचा, धार्मीकतेचा किंवा मानवतेचा मुखवटा धारण केला असला तरी हे माकड आतमध्ये आपल्या माकडचेष्टा करीतच असते.
आपल्या आत असणारे हे माकड म्हणजे प्राणी जीवनाचा प्रतिनिधी आहे.
प्राण्यांना फक्त एकच कायदा समजतो, तो म्हणजे जंगलचा कायदा.
आपल्या आत असणारे हे माकड म्हणजे या जंगलच्या कायद्याचा प्रतिनिधी आहे.
जंगलात सर्वकालीन सर्व स्तरावर मानला जाणारा हा जंगलचा कायदा एका म्हणीवर आधारलेला आहे - बळी तो कान पिळी किंवा जिसकी लाठी उसकी भैंस - ताकतवरही हमेशा जितता है!
या प्राण्यांनी आपले कायदे अगदी सुटसुटीत बनवलेले आहेत. ज्याचे पारडे जड तो विजयी. ज्याची ताकत जास्त तोच विजयी. तिथे नेहमीचीच लढाई सुरु असते - रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग. त्यामूळे तेथे सारे काही क्षम्य असते आणि इतिहास हा नेहमी विजेतेच लिहितात त्यामूळे तेथे पराजीतांना त्यांच्या मताला काही स्थान नाही.
प्रतेकजन विजयी होण्यासाठी आणि पर्यायाने शक्तिमान होण्यासाठी धडपडत असतो.
प्राण्यांच्या राज्यात तथाकथित निती-अनिती असे काही नसते. तेथे फक्त सरळ व्यवहार असतात अगदी रोख-ठोक.
प्राण्यांच्या संस्कृतीत कायदेशीर विवाह नसतात. त्यामूळे प्राण्यांच्या पत्नी लोक या तथाकथीत पतिव्रता वगैरे नसतात. त्यामूळे कोणी त्यांचे लैंगिक शोषण करु शकत नाहीत. तेथेपण रोख-ठोक व्यवहार.
मादी स्वत: स्वत:चे निर्णय घेते आणि सर्वोत्तम त्यालाच निवडते.
मादी जात-कुळ पाहत नाही तर स्वत: मर्दाची ताकत आजमावून पाहते. सर्वात लायक नरालाच फक्त ती चान्स देते. त्यामूळे प्राणी जगतात पिढ्यानुपिढ्या सर्वोत्तम निरोगी पिढी जन्मली जात होती.
पुरानकाळी मानवाच्या बाबतीतसुध्दा हेच होते. मानवसुध्दा हाच कायदा पाळत होता. मानव हा सुध्दा एक प्राणीच आहे आणि आजही त्याचा या कायद्यावर अगदी अंतरात्म्यापासून विश्वास आहे. जरा निरिक्षण केलेत तर तुम्हालाही आढळून येईल की इथे प्रत्तेकजन आपल्यापरीने जंगलचाच कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो.
खरा प्रयत्न तर त्याच मार्गाने असतो पण जर आपण त्या मार्गाने मागे पडू असे ज्यांना वाटते ते मग निती, नियम, कायदा यांचा आधार घेतात. पतिव्रता , पावित्र्याच्या ओझ्याखाली आपल्या स्त्रियांना बंधनात अडकवले जाते. नाहीतर कोणत्या स्त्रीला वाटेल की मला नंबर २ चा पुरुष हवा म्हणून. प्रत्येकाला न. १ च हवे असते.
अशाप्रकारे आपण जरी वरुन सुसंस्कृततेचा बुरखा ओढलेला असला तरी आतमधे एक जनावर जिवंत आहेच.

1 comment:

  1. Saheb.Jangle Kayda fakta janlatacha ka tikun ahe?
    Yacha artha,ajun etar pranyan madhe ladhanyachi shakti ahe je manus pranyakade aj nahiy asacha mhanav lagel,Karan jangli kayda aplyala manya asala tari apan to amlat anu shakat nahiy.
    Pratapsinh Gaikwad

    ReplyDelete

प्रतिक्रिया