Monday, January 10, 2011

४०. नात्यांमधील खेळ

पिटर वाडेन व जॉर्ज बाख या दोन मनोवैज्ञानिकांनी मिळून एक पुस्तक लिहिले आहे.
त्याचे नाव - ’ दि इंटिमेट एनिमी’ ज्याचा मराठीत भावानुवाद केला तर कांहीसा "सख्खा शत्रू" असा होईल.
१९६८ साली अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकात स्त्री आणि पुरुष यांच्यातील जटील नातेसंदर्भाविषयी खुप विस्मयकारी गोष्टी लिहीलेल्या सापडतात.
ओशो आपल्या प्रवचनात या पुस्तकातील दाखले नेहमी देतात.
आसपास जर बारकाईने पाहीले तर आपल्याला असं पाहायला मिळेल की स्त्री आणि पुरुष विषेशत: पती-पत्नी या नात्यातले, नेहमी आपआपसात डाव-पेंच खेळतात.याबाबतीत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात दुसरेच असतात. कारण दोघेही सत्याला सामोरे जायला घाबरतात. दोघांमध्ये खूप राजकारण चालते. एकमेकांपासून दुर पळण्याचे प्रयत्न असतो आणि स्त्रिया यामध्ये खूप वाकबगार असतात.
पहिला डाव- डोकेदुखी
१) पती जोपर्यंत घरी नसतो तोपर्यंत ती टिव्ही पाहत असते, टेलीफोनवरून आईशी किंवा मैत्रीणीशी गप्पा मारत असते सगळ कसं ठिक ठीक सुरु असतं. पण जेव्हा पती घरी येतो ती डोके हाताने धरून कन्हू लागते.
ही डोकेदुखी पतीची सहानुभूती मिळविन्यासाठी असते. बघा मी दिवसभर किती काम केले, घर सांभाळणे किती अवघड आहे हे तिला दाखवायचे असते.
२) डोकेदुखी -२- या डोकेदुखीचे प्रयोजन ठिक उलटे असते. ती बरोबर मध्यरात्री सुरु होते आणि ती पतीच्या प्रेमापासून बचाव करण्यासाठी असते.
विजयकुमार शास्त्री जेव्हा रात्री उशीरा आपल्या मित्रांबरोबर गप्पा संपवून घरी येत तोपर्यंत पत्नी झोपलेली असायची किंवा झोपण्याची तयारी करत असायची. कपडे बदलून ते अंथरुनात घुसून आपल्या पत्नीला म्हणत ," काय राणी, कसं कायं?" तेव्हा पत्नी लगेचच म्हणते,"इथे माझे डोके ठणकत आहे, डोक्यात नुसते घन बडवल्या सारखे दुखते आहे . . . " इ.इ.
अशाप्रकारे ती आठवडेच्या आठवडे त्यांना आपल्यापासून दूर ठेवते. प्रेमापासून वंचीत ठेवते.
विजयकुमार खुप उदास आहेत. ही नाजूक समस्या कोणाला आणि कशी सांगायची? शेवटी त्यांनाही कोणीतरी गुरु भेटलाच.
त्यानंतर ते रात्री घरी गेले. अंथरुनात जाताना हातात एक ग्लास पाणी आणि ऍस्प्रिनच्या दोन गोळ्या घेऊनच गेले. ती गडबडली व म्हणाली ," हे काय हो?"
ते म्हणाले," ऍस्प्रिन आहे, तुझे डोकं दुखत आहे ना राणी? त्याच्यासाठीच आहे हे सगळं."
त्यावर ती एकदम म्हणाली," छे छे कोण म्हणालं की माझं डोकं दुखतयं म्हणून?"
विजयकुमार म्हणाले," तो फिर आज क्या खयाल है? ... हो जाय?"

दुसरा डाव -
हा डाव पती आपल्या पत्नीबरोबर खेळतात.
दोन मित्र रात्री उशीरा पार्टीतून घरी परतत होते. त्यापैकी एकजन म्हणाला," मी जेव्हा कधीही रात्री उशीरा घरी पोहोचतो तेव्हा मला खुप भिती वाटते. मी हळूच गाडी स्टँडला लावतो, हळूच दार बंद करतो, हळूहळू बूट काढून बायकोला न उठवता आपण झोपण्याचा प्रयत्न करतो. पण तिला जाग येतेच आणि ती उठून माझी चांगलीच खातीरदारी करते.
यावर दुसरा म्हणाला," तुझी आयडीया चुकीची आहे. मलातर काही प्रॉब्लेम येत नाही. मी घरी पोहोचल्यावर जोरात हॉर्न वाजवतो, लाथ मारुन दरवाजा उघडतो, गाणी गुणगुणत कपडे बदलतो आणि अंथरुणात शिरुन बायकोला विचारतो," काय म्हणतेस डार्लिंग आज काय खयाल आहे?" आणि ती नेहमी झोपण्याचे नाटक करते.
- सौजन्य - Osho Times
visit - www.osho.com

No comments:

Post a Comment

प्रतिक्रिया