Tuesday, January 18, 2011

४३. नीतीकथा Vs अनीतीकथा

नीती आणि अनीती हे दोन एकमेकांचे विरुध्दार्थी शब्द आहेत.
नीतीची बाजू म्हणजे चांगली बाजू आणि अनीती बाजू म्हणजे वाईट बाजू असे आपण मानतो.
नीतीमानता याप्रमाणेच प्रामाणिकपणा, नम्रपणा, विनयशिलता, सत्यप्रियता असे आणखी कांही समानधर्मीय शब्द आहेत.
ग्रीक कथाकार इसाप याने लिहीलेल्या कथा या नीतीकथा म्हणून सर्वांना सुपरिचीत आहेत. इसाप या महाशयांनी प्राणी पक्षी यांच्या माध्यमातून विविध प्रसंगाच्या आधारे अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ज्यामधून आपल्याला नीतीच्या अनेक गोष्टी कळतात असे म्हंटले जाते. पण यावर माझा आक्षेप आहे. या आणि अशाच प्रकारच्या कथामधून एखाद्याला नीतीने कसे वागावे यापेक्षा अनितीने कसे वागावे यावरच जास्त मार्गदर्शन मिळते असं मला वाटते. उदाहरनार्थ एकदा एक कोल्हा करकोच्याला घरी मेजवानीस बोलावीतो आणि उथळ थाळीत खीर देऊन त्याला उपाशीच राहावयाला भाग पाडतो. त्यानंतर तो करकोचा त्याच कोल्ह्यास आपल्या घरी मेजवानीस बोलावितो आणि एका उभट भांड्यात खीर देतो. त्यामूळे तो कोल्हा उपाशी राहतो.
याकथेवरून कोणती नीतीची गोष्ट आपल्याला कळते?
आपण दुस-याशी वाईट वर्तन केल्यास कधीतरी आपल्यावरही तशीच वेळ येऊ शकते. तेव्हा घरी येणा-या पाहूण्यांशी योग्यप्रकारे वर्तन करावे. असा निष्कर्ष खूप कमी लोक घेतात. तर एखाद्याला घरी बोलावून त्याची कशी फजीती करावी हेच जास्तजण शिकतात. जर एकादा सरळमार्गी असेल तर त्याला वाममार्गाचा परिचय करुन देण्याचं काम या गोष्टीद्वारे होते असे मला वाटतं. मोठ्या मानसांची ही गत तर आपण या गोष्टी लहान मुलांना वाचायला लावतो. अशाप्रकारे जाणीवपुर्वक लहान मुलांमध्ये आपण चालूगीरी, लूच्चेगीरी शिकवितो असं मला वाटते. मग या कथांना नीतीकथा असे कसे म्हणायचे, यांना अनीतीकथा असे म्हणावे लागेल.
त्यामानाने भारतीय पंचतंत्रामधील गोष्टी या जास्त उजव्या आहेत.
इसापनीतीमधील कांही कथा खुप सुंदर आहेत तर कांही कथातून गुप्तपणे वाईट शिक्षण मिळते. जाणत्या माणसांना वाचायला ठिक आहेत पण अजाणत्या आणि लहान मुलांना या वाचायला देणे हितावह नाही असे मला वाटते. या आणि अशा कथांमुळेच मुले स्वार्थी आणि आळशी होण्याची शक्यता जास्त असते.
यापुर्वी मी लोभी कुत्र्याची कथा यावर लिहीलेला लेख काहींना आवडला तर कांहीजणांनी त्यावर आक्षेप घेतला. एका वाचकाने तर मला ती कथाच कळली नाही असा आक्षेप घेतला. पण आपण जरा माझ्या दृष्टीतून या कथांकडे पाहीले तर या कथांमधील खोट आपल्या ध्यानात यायला सुरुवात होईल.
या असल्या नीती कथा लहान मुलांना सांगणे म्हणजे औषधापेक्षा रोग बरा म्हणावा लागेल. फार तर काय सगळी मुले सरळमार्गी होतील. जगातला खोटेपणा, चालूगिरी कमी होईल

2 comments:

  1. tumhi khup chhan ani khare ahe te lihit ahat so keep it up ,amchya sarvancha tumhala pathimba ahe..........

    ReplyDelete
  2. खरे तर नीती म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती अधिक चांगली करण्यासाठी आपल्याला प्रेरित करणारी प्रेरणा. पण चांगल्यावाईटाची प्रत्येकाला मान्य होईल अशी व्याख्या करता न आल्याने परंपरेने नीतितत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यांचा उपयोग नीतिमत्तेकडे जाणारी दिशा दाखविण्यापुरताच आहे. त्यानां ब्रह्मवाक्य समजण्याचे कारण नाही.

    ReplyDelete

प्रतिक्रिया