Monday, September 20, 2010

२७. बालकांचे मानसशास्त्र

काही वर्षापुर्वी सुप्रसिध्द विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांनी लिहीलेल्या बालकांचे मानसशास्त्र या विषयावरील पुस्तकातील कांही उतारे एका जुन्या दिवाळी अंकात छापून आले होते. त्यातील दोन प्रसंग मला खुप आवडले.
प्रसंग - १ ला.
एका शहरात एक कृषीप्रदर्शन भरलेले होते. त्यामध्ये शेतीविषयक औजारे, बी-बियाणे, खते इ. स्टॉल लागलेले होते.
ते पहायला एक शहरी, सुशिक्षीत जोडपे आपल्या एकुलत्या एका मुलग्याला घेउन आलेले असते.
प्रदर्शनाच्या सुरवातीसच एक पाणी उपसण्याचा पंपसेटचा स्टॉल असतो तेथे हे तिघे पोहोचतात. तिथला सेल्समन त्या पंपाची सर्व माहीती देतो. तो पंपसेट पाहील्याबरोबर तो मुलगा हा आपल्याला पाहीजेच म्हणून हट्ट करु लागतो. त्याचे मम्मी-पप्पा त्याला खुप समजावून सांगतात,"अरे हा नेऊन आपण कुठे लावणार आपल्याकडे विहीर आहे का?"
" विहीर खोदुया" तो मुलगा.
"अरे विहिर कशी खोदणार आपल्याकडे जागा कुठे आहे? आपण तर दुस-या मजल्यावर राहतो ना ?"
"मग दुस-या मजल्यावर विहिर खोदु, ऍ~"
असा त्यामुलग्याने एक्च धोशा लावला. आपाल्याला तो पंप पाहीजे म्हणजे पाहीजेच असा हट्ट तो काही केल्या सोडेना. रडून ओरडून दंगा सुरु केला. तेव्हा तो सेल्समन म्हनाला तुम्ही त्याला इथेच सोडा आणि बाकीचे प्रदर्शन पाहून या, मी त्याला व्यवस्थीत समजावून सांगतो.
ते जोडपे त्याला सोडून पुढे गेले. जोडपे दिसेनासे झाल्यावर त्या सेल्समनने त्या मुलग्याला विचारले," कारे तुला पंपसेट कशाला पाहीजे? तुझी काय विहिर आहे काय? "
" नाही, मला पाहीजेच ऍ ..."
’थाड्ड’. त्या सेल्समनने एक कानाखाली दिली आणि मग विचारले," काय रे बाळ तुला पंपसेट हवा काय?"
गाल चोळतच तो म्हणाला "नको मला काही नकॊ"
’थाड’ " पुन्हा मागशील का?"
"नाही"
मम्मी पप्पा जेव्हा परत आले तेव्हा तो मुलगा पळत जाऊन त्यांना बिलगला व म्हणाला " आपल्याला कशाला हवा पंपसेट, आपल्याकडे तर विहिरच नाही"

तात्पर्य: नेहमीच लाडाचा उजवा हात न वापरता कधीकधी डावा हातही वापरावा लागतो.

प्रसंग - २ रा.
हा प्रसंग ग्रामीण भागातील आहे.
रस्ताकडेला एक पिंजराची गाडी उलटलेली असते. त्या शेजारीच एक लहान मुलगा रडत बसलेला असतो.
रस्त्याने जाणा-या एका सदगृहस्ताला त्या मुलाग्याची दया आली त्यांनी त्याला उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि आपल्या घरी घेऊन जाऊ लागले.
वाटेत त्या मुलाचे," बाबा आआआ" असे रडणे सुरुच होते.
वाटेत एक दुकान लागले तेव्हा त्यांनी त्या मुलाला काही चॉकलेट घेऊन दिली ती त्या मुलाने एकामागोमाग एक खाउन संपविली आणि परत " बाबा आआ" असा सूर धरला.
घरी गेल्यावर त्यांनी त्याला कांही बिस्कीटे दिली ती खाऊन झाल्यावर पुन्हा त्याने " बाबा" असा सूर धरला.
त्या सदगृहस्ताला कांही कळेना. या मुलाला काय द्यावे म्हणजे हा शांत होईल हे त्यांना कळेना. तो आपले " बाबा" काय सोडेना.
शेवटी त्यांनी परोपरीने विचारले,"बाळ तुझे बाबा कूठे आहेत?"
मग तो मुलगा आनखीनच रडू लागला. शेवटी त्या मुलानेच सांगीतले की माझे बाबा त्या पिंजराच्या ढिगा-या खाली आहेत म्हणून.
तात्पर्य: खाणे हेच सर्वस्व नसते त्यापलीकडेही मुलांना आपल्या आईवडीलांची काळजी असते.

2 comments:

  1. प्रदीप,
    दोन्ही गोष्टी बाळबोध असल्या तरी आवडल्या.छान आहेत कारण तात्पर्य महत्वाचे आहे.धन्यवाद.

    ReplyDelete
  2. khupach chhan bodh milala

    ReplyDelete

प्रतिक्रिया