Wednesday, October 13, 2010

३०. नर सुंदर की नारी ?

कोण म्हणतं की स्त्री ही पुरुषापेक्षा सुंदर दिसते म्हणून?
स्त्री ही पुरुषापेक्षा सुंदर दिसू शकत नाही. जर कोणी तसे म्हणत असेल तर तो एखादा पुरुष असेल ज्याला स्त्रियांची खोटी प्रशंसा करुन त्यांना खुष करायचे असावे. किंवा एखादी उतावीळ स्त्री तरी असेल असेल जिला आपल्याशिवाय इतर कांही दिसत नाही.
आपण म्हणाल की याला काय पुरावा आहे? काय दाखले आहेत? की पुरुषच स्त्रीपेक्षा जास्त सुंदर आहे म्हणून. मग पुरुष स्त्रीयांच्यामागे का लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या आवती भोवतीच आहेत.
निसर्गाकडे पहा फार लांब नाही जरा मोर आठवून पहा. मोर सुंदर की लांडोर. लांडोर हा काय प्रकार असतो बुवा? मी नाही पाहीला लांडोर - असं कोणी तरी म्हणेल कारण, मोरांच्या सौदर्यापुढे मोराची मादी लांडोर अगदीच फिक्की आहे. याबद्दल आपले दुमत नक्कीच नसणार.
कोकीळचा आवाज आपण कधीतरी ऐकला असेल. हा मंजूळ आवाज नर कोकीळचाच असतो. मादी बहूदा घुम्मीच असावी.
बैल पहा कसा डौलदार आहे. आपले डोलणारे वशींड घेऊन चालणारा बैल म्हणजे डब्लू डब्लू एफ मधला "द रॉक". त्यामानाने गाय अगदीच बापूडवाणी दिसते. ना ऐट ना बाज.
सिंह हा जंगलचा राजा पहा त्याला आपल्यासारखीच दाढी असते पण तो कोरत वगैरे बसत नाही. आपली आयाळ तो भरमसाठ वाढवीतो आणि त्यामुळे त्याचे पुरुषत्व आनखीनच उठून दिसते.
त्याच्या मादीला आयाळ नसते व ती अगदीच मऊ मांजर दिसते.
मांजरातही बोका हा खुपच सुंदर असतो. याबाबतीत आपल्यापेक्षा स्त्रियांचे जास्त एकमत होईल कारण ब-याच श्रीमंत स्त्रीयांना आपल्या कुशीत बोका नसला की कसे ओके-बोके वाटते.
शेळपट शेळी समोर बोकड पहा कसा कर्ता पुढारी असल्यासारखा मिरवत असतो आणि शंभर शेळ्यातूनही एक बोकड उठून दिसतो.
शंभर कोंबड्यात फिरणारा एकटा कोंबडा हा पुर्वीच्या जमीनदारासारखा किंवा पाटला सारखा ऐटबाज दिसतो. त्याच्या डोक्यावरचा तुरा पाहूनतर त्याची दृष्टच काढायला हवी.
बाकी आता डिस्कव्हरी चैनलपर्यंतही जायला नको. ज्याप्रमाणे बाकीच्या वर्गातील माद्यांपेक्षा नरच अधिक सूंदर आहेत त्याप्रमाणेच आपल्यातही नरच जास्त सुंदर आहे. बैलाप्रमाने फूरफूरनारे बाहू, सिंहासारखी आयाळ,वाघाची चाल, कोंबड्याचा तोरा, मोराची ऐट, बोक्याची मिजाशी असणा-या पुरुषासमोर स्त्रीया म्हणजे किस झाडकी पत्ती. होय ना?
एवढ्यातच आपली शंका दुर झाली असणार की पुरुषच जास्त सुंदर आहेत. पण तो स्त्रीयांच्या मागे का लागतो किंवा स्त्रीयांनाच सुंदर का मानतो याचे उत्तर आजून बाकी आहे.
त्याचे उत्तर आहे ते म्हणजे स्त्रीय़ांकडे असणारा अनमोल दागिना - त्यांचे "स्त्रीत्व".
त्यांचे स्त्रैनपणा. उदाहरनच द्यायचे झाले तर त्यांचे लाजणे, आहाहा . . . .
कोणीतरी म्हटले आहे" एक नूर आदमी दस नूर कपडा तसेच एक नूर नारी हजार नूर नखरा" खरं आहे ना? (चूक भूल द्यावी घ्यावी)

3 comments:

  1. भारी लेख !! मस्त उदाहरण दिलेत !!! आणि निष्कर्ष आवडला मला !!

    ReplyDelete
  2. aher Pradip SHANKAR 8888585750February 1, 2012 at 10:39 AM

    sHREE Purusha Shivay Pripurna Hou shakat nahi

    ReplyDelete

प्रतिक्रिया