इथे सर्व जन धावत आहे. प्रत्तेकाची धावाधाव चालूच आहे. नद्या धावत आहेत, नाले धावत आहेत, ओढे धावत आहेत. पण समुद्र ?
तो तर तिथेच आहे. वर्षानुवर्षे युगानुयुगे तो तिथेच आहे. तो धावत नाही.
त्याला हे ओढे नाले नद्या सर्वजन सांगत आहेत अरे थांबलास काय धाव धाव , आम्ही सर्व धावतोय, तु ही धाव,आळस करू नको, ते त्याला समजावू पाहतात धावण्याचे फायदे. पण हे धावणारे आतापर्यंत कोठे पोहोचलेत?
समुद्र थांबलेला आहे,
स्थिर,
प्रगल्भ,
अथांग,
अनंत,
अचल, ...
समुद्र थांबलेला आहे कारण तो पोहचलेला आहे... की समुद्र पोहचलेला आहे कारण तो थांबलेला आहे म्हणुन...
....
....
कुठे धावत आहात कोठे पोहोचायचे आहे?
थांबा आणि पहा,
रुके पांव मिले गांव,
तुम रुके तो "जिंदगी अभी और यहीं है"!!
Ekdam sahi aahe mitra...nice one...
ReplyDelete