"आमचं गण्या sss शानं, म्हंणतयं.." अशी सुरवात केल्याबरोबर आपल्याला प्रा. कोष्टींची आठवण होईल.
पण आमच्या गल्लीत पण एक गण्या राहतो आणि तो प्रा. कोष्टींच्या गण्याचा साढ्भाउ शोभेल असाच आहे.
त्याच्या नाना करामतीमूळे तो जिथे असेल तिथे त्याचंच राज्य असतं. जमलेले लोक आपलंच बोलणं ऐकायला आले आहेत असा त्याचा गोड गैरसमज झालेला होता. त्यामूळे गण्य़ा हजर असला की गप्पांचा फड उभा राहत असे.
ही गोष्ट जरा जूनी, काही वर्षापूर्वीची आहे. पूर्वी म्हणजे कोल्हापूर एफएम रेडीओ सूरू होण्यापूर्वी आमच्याकडे सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जात होते तेंव्हाची.
सांगली आकाशवाणीवर काही ठरावीकच जाहीराती लागत असत. पैकी "मगदूम चहा"ची जाहीरात जरा वेगळीच होती. त्यावेळी आम्हाला जाहीरातीसुध्दा ऐकायला आवडत होत्या. पण "मगदूम चहा"ची जाहीरात अजून लक्षात राहीली त्याला कारण म्हणजे आमचं गण्या.
तर आमचं हे गण्या रेडिओला लागलेली सगळी गाणी त्या गायकासोबतच अगदी तालासूरात म्हणायचं. गायकपण ह्योच गायीकापण ह्योच आणि म्युझीक पण ह्योच द्यायचा. तोंडाने पिटिक-पिटिक , झुम-चाक-झुम असं ह्याच म्युझिक. गण्याला सगळी गाणी तोंडपाठ आणि सगळ्या जाहीरातीपण.
गण्याला ही "मगदूम चहा"ची जाहीरात खुपच आवडली होती. साधारणपणे पूढील प्रमाणे ती आम्ही ऐकत असू.
"सखू, च्या टाक पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.
" जी" - सखूचा नम्र आवाज
"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज
"अहो सुवासनीनं कुक्कवाला आणि मर्दानं चहाला नगं म्हणू नये!"
" पण, आम्ही नेहमी मगदूमचा कडक चहाचं पितो?"
" आणि आम्ही काय उन पाणी पितो काय? आमीबी आमच्या आबाआज्यापासून मगदूमचा कडक चहाचं पितो!"
" मग, होवून जाउदे, डब्बल"
तर अशी ही जाहीरात गण्यानं आम्हाला शेकडोवेळा ऐकवीली असेल.
एवढ्यानं थांबेल तो गण्या कसला? काही दिवसांनी त्यानं या जाहीरातीची एकापाठोपाठ दोन विडंबन तयार करून ऐकवीली. ती अशी.
"सखू, च्यात टाक पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.
" जी" - सखूचा नम्र आवाज
"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज
"अहो सुवासनीनं न्हायाला आणि मर्दानं पवायला नगं म्हणू नये!"
(न्हायाला- नहायला म्हणजे अंघोळ करायला आणि पवायला म्हणजे पोहण्याला)
" पण आम्हाला पोहायला येत नाही?"
असं म्हणत म्हणतच गण्या समोरच्या माणसाकडे हात पुढे करुन टाळी मागायचा व ती त्याला हमकास मिळायची. मग गण्या यापाठोपाठ त्याची दूसरी जाहीरातही ऐकवायचा.
"सखू, आत घे पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.
" जी" - सखूचा नम्र आवाज
"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज
"अहो ----- नं पावण्याला आणि मर्दानं -----ला नगं म्हणू नये!"* (* समजून घ्या)
" पण, आम्ही नेहमी डिलक्सचा निरोध वापरतो?"
"आणि आम्ही काय फाटके फूगे वापरतो काय? आमीबी आमच्या आबाआज्यापासून डिलक्सचाच निरोधचं वापरतो!"
" मग, होवून जाउदे, डब्बल"
-----
मग आहे की नाही आमचं गण्या इरसाल? मगदूम चहावाल्यांनी किंवा डिलक्सवाल्यांनी ही जाहीरात ऐकली नाही म्हणजे बरं.
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया