Wednesday, May 19, 2010

९. पुन:श्च हरी ओम !

आज जगात जवळपास सर्वच धर्मांची वाताहत झाली आहे. एका नवीन धर्माची निर्मीती होणे खुप गरजेचे झाले आहे. नवीन धर्म जो प्रत्तेकासाठी सुटेबल असेल. नवीन धर्म हा आतापर्यंतच्या धर्मांसारखा सार्वजनिक नसेल तर नवीन धर्म पुर्णत: वैयक्तिक स्वरुपाचा असेल. त्यामध्ये नवीन मंदिराची गरज भासनार नाही, नवीन देव निर्माण होणार नाही, नवीन पंथ निर्माण होणार नाहीत, उच्च-नीच असा भेदभाव नसेल, पुजारी, भट, पंडित नसणार. नवीन धर्माची फक्त एकच दिक्षा असेल एकच संदेश असेल तो म्हणजे "आनंदी रहा".
आनंदी राहणे खुप सोपं आहे.
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण खुष होतो, आनंदी होतो. त्या आनंदी राहण्याला कोणतेही कारण नव्हते. आनंदी राहण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही. कारण आनंद हा आपला स्थाईभाव आहे. जसजसे आपण मोठे होत आलो तसतसे आपण दु:खी होत गेलो कारण आपण दु:खी राहण्यासाठीची कारणे शोधु लागलो. आणि या दु:खी राहण्यालाच धर्माचे नाव दिले गेले. आपल्याकडे पैसा नाही म्हणून दु:खी, अमुक कंपनीची कार नाही म्हणून दु:खी, आपण काळे आहोत म्हणून तर कोण आपण बुटके आहोत म्हणून, कोणाला घर पाहीजे कुणाला पद प्रतिष्ठा पाहीजे म्हणून दु:खी. या सर्वाच्या उलट आपले धर्माचे तत्वज्ञान पैसा सोडा, पद सोडा, त्याग करा इ.इ. मग आपण आनंदी कसे राहू. परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे ते असे दु:ख करत बसण्यासाठी नक्किच नाही. त्याने अगदी गवताच्या फुलापासून हत्ती सारख्या महाकाय प्राण्यापर्यंत सर्वांच्यासाठी हे जग निर्माण केले आहे व त्या जगात सर्वांच्या गरजांची काळजी घेतली आहे.
" रख्खा है पास रहने में क्या, रख्खा है आस रखने में क्या,
एक आदतसी पड गयी है, वरना रख्खा है उदास रहने में क्या!"

आपल्याला उदास राहण्याची सवय लागलेली आहे. आपण दु:खाला सोडण्यास तयार नाही. आपण आपल्या दु:खांना ग्लोरिफाय करत आहोत. म्हणून आपल्या देशात तथाकथित साधेपणावर भर दिला जातो.


एकदा चंदूलाल मारवाडी आयुष्याभर पैसा कमावून (पै ला पै जोडून) सरतेशेवटी दुनिया पहायला लंडनला गेला होता. तिथे सात बंगला टाइपची एकाला लागुन एक अशी सात गगनचुंबी इमारतींची रांग पहात असताना चंदुलालचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. या इमारती बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला असेल. तो पैसा कधी साठवला असेल. आपल्या आयुष्याची सारी जमापुंजी एकत्र करुनसुध्दा या इमारतीमधील एखादी खोलीतरी खरेदी करु शकू का? हा विचार करत असताना त्याने एका फिरंगी मानसाला एका पाठोपाठ एक अशा सिगार ओढताना पाहिले. तो इंग्लिश जंटलमन आपल्याच आनंदात गुंग होता. तीन-चार सिगार संपल्यानंतर चंदुलालची सहणशीलता संपली. त्याने विचार केला हा मनुष्य किती मुर्ख आहे आपला पैसा या शुल्लक सिगार फुकण्यासाठी वाया घालवतो आपण त्याला काही चांगले प्रगतीचे ज्ञान शिकवायला हवे. साधेपणाचे महत्व पटवून द्यायला हवे. चंदुलाल त्याला म्हणाला "महोदय, मी बराचवेळ आपले निरिक्षण करतोय आणि माझा असं ध्य़ानात आलं आहे की आपण सिगार ओढण्यासाठी खुपच पैसा खर्च करता, जर हाच पैसा आपण जमा केला असता तर या इमारती पैकी एकतरी इमारत आपली झाली असती." त्यावर तो जंटलमन उत्तरला की या सर्व इमारती मी स्वत: उभा केल्या आहेत, व त्या माझ्याच मालकीच्या आहेत. तुमच्या मालकीच्या किती इमारती आहेत?, तुम्ही आतापर्यंत किती पैसा साठविला आहे?" हे ऐकून चंदुलालचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
आपल्य़ाकडे हे असंच होतं. आपली गरीबी आपण आपल्या स्वनिर्मित तत्वज्ञानाच्या खाली लपवू पाहत असतो. पण आतून आपण दु:खीच असतो. पैसेवाल्यांचा द्वेषच करत असतो. फक्त वरच्या मनाने म्हणायचे की जग भौतिक सुखाच्या मागे लागले आहे पण आम्ही अध्यात्मिक सुखाची अनुभुती घेत आहोत. हे लोक आपल्याच चक्रव्युहात अडकलेले आहेत. त्यांच्याकडे ना पैसा आहे ना आध्यात्म आहे. ते ना विज्ञानाला मानतात ना त्यांना अध्यात्माचा गंध आहे.

कोल्हापूरला काही वर्षापुर्वी एक जैन प्रवचनकार आले होते. त्यांना जैन लोक खुप मानायचे त्यांना क्रांतीकारी संत म्हंटले जाते. ते जैन धर्माचे कट्टर अनुयायी आहेत असं लोक म्हणतात. त्यांच्या सेवेला आमदार, खासदारपासुन क्लासवन अधिकारी लहान थोर असे हजारो लोक हजर होते. ते अंगावर कोणतेही वस्त्र वापरत नाहीत, कंगवा वापरत नाहीत, केस कापत नाहीत, चपला वापरत नाहीत (बहूतेक पादुका वापरत असावेत), फक्त एकदाच अन्न म्हणून काहीतरी प्राशन करतात, एकभुक्त आहेत इ. इ. अशा या महापुरषाला एक आजार झाला तेव्हा मात्र डाक्टरकडे धावाधाव झाली. डाक्टरांनी त्या महात्म्यांना एका शस्त्रक्रियेचा सल्ला दिला व शस्त्रक्रियेशिवाय तरणोपाय नाही असे सांगितले. तेव्हा या महाशयांच्या समोर यक्षप्रश्न उभा राहीला. आपण तर शरिरापेक्षा आत्म्याचा पुरस्कार करणारे, भौतिक सोडून आध्यात्माकडे लोकांना वळवणारे, आपण एवढे मोठे त्यागमुर्ती, त्यागाविषयी एवढी प्रवचने दिली, आपली साधी राहणी ज्यामुळे एतके लोक आपल्याला मानतात मग ही शस्त्रक्रिया करणे म्हणजे शरिराला म्हणजेच भौतिकालाच आपण महत्व दिल्यासारखे झाले असे त्यांना जानवू लागले. यावर त्या त्यागमुर्ती क्रांतिकारी संताने एक महिण्याचा लांबलेला आपला मुक्काम गुंडाळून लगोलग मुंबई गाठली.
काही दिवसांचे सोबती असणारे हे मुनी आजही टीव्ही चैनलवर आपले क्रांतीकारी विचार ऐकवत असतात. परवा ते एका प्रवचनात कैकयी ही कौशल्यापेक्षा कशी महान होती हे सांगत होते. कैकयी ही युध्दामध्ये आपल्या करंगळीने रथाचे चाक पकडून दशरथासाठी कसा त्याग करते, आपल्या शरिरापेक्षा त्यागाला कसे महत्व देते हे ते पटवून देते होते आणि समोर हजारो लोक ते ऐकुन धन्य होत होते. आणि कदाचीत या प्रवचनासाठीच या महोदयांनी आपल्या कित्तेक वर्षांची तपश्चर्या सोडून शस्त्रक्रिया करुन घेतली असेल. किती मोठा त्याग?

हे सगळं सोडण्याची वेळ आता आली आहे.
आता कोण किती त्याग करतो हे पहायचं बंद केले पाहीजे. आपला पुरानकाळ सोडला पाहिजे, राम, कृष्ण, अर्जुन, बुध्द, महावीर या आपल्या पुर्वजांचा वारसा सांगणे आता बंद केले पाहीजे. ते या देशात कधीकाळी जन्मले होते हे आता आमच्याकडे पाहून कोणालाही पटनार नाही.

आता वेळ आली आहे नवी सुरवात करण्याची.

पुन:श्च हरि ओम !

2 comments:

  1. सर्वच धर्मांचा उद्देश सुखाची वृद्धी व दु:खाचा निरास हाच आहे. गोंधळ होतो तो सुखाचे व दु:खाचे स्वरूप ठरविताना.

    ReplyDelete
  2. सुखाची व्याख्या या विषयावर ऒशोंनी सांगितलेला चुटका आठवला तो येथे सांगतो. चंदूलाल रस्त्यावरून खुप कण्हत विव्हळत चाललेला असतो. एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत चाललेला असतो. त्याला असे चालताना पाहून कोणीतरी विचारले,"अरे चंदूलाल, काय हे पायाला काय जखमवगैरे झाली आहे का? चप्पल तुटली आहे?" चंदूलाल म्हणाला," ना पायाला जखम झाली आहे ना चप्पल तुटली आहे, चप्पल तर अगदी नवी आहे पण साईजला जरा लहान होते आहे." "मग तू ती चप्पल बदलून योग्य साईजची का घेत नाहीस?" तेव्हा चंदूलाल रागाने म्हणाला," आहारे, म्हणे चप्पल बदलून घे, मीच माझ्या सुखावर कशाला पाणी सोडू!, अरे दिवसभर हे असे कण्हत, विव्हळत मोठ्या कष्टाने चालून, थकून भागून जेव्हा मी घरी जातॊ व हे चप्पल पायातून काढून पाय पसरून मस्त पलंगावर बसतो तेव्हा काय सांगू त्या सुखाची तुलना स्वर्गाच्या सुखाशीच होईल."
    असेही सुखाचे स्वरुप असू शकते आणि त्याला प्राप्त करणेपण खुपच सोपे असते.

    ReplyDelete

प्रतिक्रिया