Saturday, January 08, 2011

३९. कथा: सुफी शिक्षणाचा मार्ग

शाह फ़िरोज हे एक सुफी संत होते आणि त्यांना विशेषत: सुफी संतांचे गुरु म्हणून ओळखले जात होते. त्यांना नेहमी विचारले जाई की आपण शिक्षण देण्य़ास इतका वेळ का लावता. तेव्हा ते म्हणत,"अगदी समर्पित व्यक्तिसुध्दा जोपर्यंत समजण्याच्या एका खास पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो शिक्षण प्राप्त करण्यास योग्य ठरत नाही. इथे फक्त त्याचे शरीर हजर असते बाकी कांही नाही."
त्यांनी एक कथा सांगितली ती अशी...
एकदा एका सुलतानाला सुफी व्हायचे होते.
जेव्हा तो यासाठी एका सुफी संताला भेटला तेव्हा तो सुफी म्हणाला," बाद्शहा सलामत, आपण निवडलेल्या बाकीच्या लोकांबरोबर तोपर्य़ंत शिक्षण घेऊ शकत नाही जोपर्यंत आपण बेशुध्दीतून बाहेर येत नाही."
"बेहोशी!," सुलतान म्हणाला," मी माझी धार्मिक कर्तव्ये पार पाडतो, प्रजेकडे लक्ष देतो, आणि कोण आहे जो मला बेहोश समजतो?"
" बस! हीचतर खरी समस्या आहे", सुफी संत म्हणाला," कारण सजगतेला लोकांनी अशा गोष्टीबरोबर जोडले आहे की ते स्वत:ला सजग मानून जगत आहेत."
" मी आपली ही दुर्बोध भाषा समजू शकत नाही आणि म्हणूनच आपण मला अयोग्य समजत असाल."
" बिलकूल नाही, परंतू एक भावी शिष्य आपल्या भावी गुरुबरोबर वादविवाद करु शकत नाही. सुफी लोकांचे कार्यक्षेत्र हे प्रज्ञा असते, तर्क नाही. परंतू तुला मी तुझ्या बेहोशीचा प्रत्यक्ष दाखलाच देतो. तू माझ्या म्हणन्यानुसार एक परिक्षा दिलीस तर तूलाही समजेल."
सुलतान तयार झाला.
सुफी संताने सांगितले की पुढे कांही काळासाठी ते जे कांही म्हणतील त्यावर सुलतानाने फक्त इतकेच म्हणायचे आहे की,"माझा आपल्यावर विश्वास आहे"
सुलतान म्हणाला," जर हीच परिक्षा असेल तर सुफी होण्याची सुरवात तर खुप सोपी आहे."
परिक्षेला प्रारंभ झाला.
सुफी संत म्हणाला,"मी विश्वाहून मोठा आहे"
सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"
"मी खोटा आहे"
सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"
"जेव्हा तू जन्मलास तेव्हा मी तिथे उपस्थीत होतो"
सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"
"आणि तुझे वडिल एक सामान्य शेतकरी होते"
"खोटे आहे! खोटे आहे" सुलतान ओरडला.
सुफी संतांनी त्याच्याकडे दुखी नजरेने पाहीले आणि म्हणाले," आपण इतके बेहोश आहात की एक क्षणभरसुध्दा आपले मन मध्ये आणल्याशिवाय फक्त ’ माझा आपल्यावर विश्वास आहे" असं म्हणायचे आहे हे विसलात, आणि म्हणूनच आपल्याला कोणीही दिक्षा देऊ शकणार नाही"
सुफी लोकांचे कार्यक्षेत्र प्रज्ञा आहे. ते तुम्हाला मार्ग दाखवू शकतात, जो त्यांनी जाणला आहे. परंतू ते तर्क-वितर्क करत बसत नाहीत. ते तुम्हाला कोणताही नियम, सिध्दांत देत नाहीत. ते निष्णात वैद्य आहेत. ते औषध देतात. जसा रोग तसे औषध. आणि ते औषधच तुमचे डोळे उघडते.
- ओशो (जो बोलें तो हरीकथा)
visit www.oshoworld.com

1 comment:

प्रतिक्रिया