Thursday, January 06, 2011

३८. यशाचे रहस्य - सम्यक जीवन

ऒशो-
एकदा हसीदियम आपल्या लवाजम्यासह बसलेली होती, हातात चिलीम घेऊन रबाई इजरायल तिथे येऊन बसला...
एखादा संत हातात पाईप घेउन आलेला असा विचार तुम्ही कधी केला आहे का? हसीद म्हणतात साधारण जीवनालाच दिव्यरुप द्यायचे आहे, पवित्र बनवायचे आहे. तुम्ही चिलीम ओढतानासुध्दा ती देवाची प्रार्थना करत असल्यासारखी ओढाल किंवा प्रार्थनासुध्दा चुकीच्या पध्दतीने कराल. तुम्ही मंदिरात जाऊनही प्रार्थनेपासून वंचीत राहू शकता.
तेव्हा रबाई स्नेहपुर्ण वातावरणात बसलेला पाहून त्यांनी विचारले, "प्रिय रबाई, आम्हाला सांग की आम्ही ईश्वराची सेवा कशी करावी बरे?"
दृढ मैत्रीच्या ठिकाणीच असे प्रश्न आपण विचारू शकतो, नाही का? गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये अशीच दृढ मैत्री असते.
रबाई या प्रश्नावर चकीत झाला आणि म्हणाला," मला काय माहीत?"
पण त्यानंतर त्याने एक कथा सांगितली ती अशी.....
सगळे शिष्य एकत्रीत जमले व लक्षपुर्वक ऐकू लागले. वातावरण स्नेहपुर्ण व तणावरहीत होते. कथाकथनाचे हेच वैशिष्ठ्य असते की ऐकणारा लक्षपुर्वक ऐकतो पण त्याच्यावर तणाव येत नाही. आतमध्ये सजगता असते की आता पुढे काय होणार पण गंभीरता नसते. या तणावरहीत सजगतेमुळे तुम्ही ध्यानात उतरू शकता.
रबाई: " एका राजाचे दोन मित्र असतात आणि दोघेही एका गुन्ह्यात अपराधी सिध्द झालेले असतात. राजाचे दोघांवरही प्रेम असते त्यामुळे तो त्यांच्यावर दया दाखवू इच्छीत होता. परंतु राजा त्या दोघांना शिक्षेशिवाय सोडूही शकत नव्हता. न्यायासमोर सगळे समान असतात.
त्याने निकाल ऐकवला की एका खोल दरीवर रस्सी बांधली जावी व दोघे एकापाठोपाठ त्या रस्सीवरुन चालतील. जो दरी पार करेल त्याला जीवदान मिळेल.
राजाच्या हुकुमाची लगेचच अम्मलबजावणी केली जाते.
पहिला मित्र दरी सुरक्षीतपणे पार करतो.
दुसर-या मित्राने आपल्या जागेवरुनच त्याला ओरडून विचारले," माझ्या मित्रा मला सांग की तू ही दरी कशी पार केलीस?"
पहिला जोराने ओरडून त्याला म्हणाला, " मला एवढेच माहीत आहे की जेव्हा जेव्हा एका बाजूला माझा तोल जात होता तेव्हा तेव्हा मी दुस-या बाजूला झुकत होतो."
कथा संपली.
सामन्यपणे दोनप्रकारचे लोक असतात. पहिला सरळ पार झाला. दुसरा विचारू इच्छीतो की कसं पोहोचायचं? खोल दरीवर बांधलेला दोर, खतरा आहे. कांही रित, पध्दत, टेकनिक ? ...
पहिला सरळ चालत गेला खुप श्रध्दावान मनुष्य असणार तो. तो यासाठी थांबला नाही की प्रथम दुसरा पोहचू देत, मग पाहू. त्याने जीवनात एकच गोष्ट शिकली असेल, शिकण्याची एकच गोष्ट- स्वानुभव. कारण दुस-याला चालताना पाहून आपण रस्सीवरुन चालू शकत नाही.
आणि हा दुसरा मनुष्य म्हणजे गर्दीचा प्रतिनिधी आहे. हा आपल्या पूर्वज्ञानावर अवलंबून आहे. हा आपल्या भुतकाळावर अवलंबून आहे.
पोहोचल्यावरसुध्दा पहिला म्हणाला की मलाही माहीत नाही की मी कसा पोहोचलो ते. फक्त एवढेच म्हणाला की जेव्हा जेव्हा एका बाजूला माझा तोल जात होता तेव्हा तेव्हा मी दुस-या बाजूला झुकत होतो.
या कथेद्वारे रबाई सांगत आहे की मध्य साधा.
सम्यक रहा.
न जादा त्याग ना जादा भोग.
त्याने एक सुंदर कथा निवडली. ना त्याने ईश्वराच्या गोष्टी केल्या ना ईश्वरसेवेच्या.
त्याने प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ दिले नाही, कदाचीत शिष्यच आपला प्रश्न विसरले असतील.
- ओशो (दि आर्ट ऑफ डाईंग)
visit www.oshoworld.com

2 comments:

  1. At last you have started to spread the virus- OSHO - Thanks

    ReplyDelete
  2. very thanks for sharing

    ReplyDelete

प्रतिक्रिया