Wednesday, January 05, 2011

३७. कथा - सांगू तरी कोणाला? ऐकतो कोण?

साधू-संतांनी सांगितलेल्या किंवा पुस्तकातून वाचलेल्या छोट्या छोट्या कथा मला खुप आवडतात. त्या इतरांना सांगून सांगता सांगता त्यातील मर्म जाणण्याचा प्रयत्न मी करतो. कथा ऐकण्यातून जसा आनंद मिळतो, खुप शिकण्यास मिळते तसे सांगतानाही मिळते. ओशोंनी कथांचा खुप चांगला आणि परिणामकारक वापर आपल्या प्रवचनांमध्ये केलेला आहे. आपल्या कथांबद्दल ते एके ठिकाणी म्हणतात -
कथाकथनाच्याद्वारे त्या गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात ज्या गोष्टी सरळ सरळ सांगितल्या जाऊ शकत नाहीत. कथा सांगणे म्हणजे हाताच्या बोटांनी चंद्राकडे केलेला इशारा. बोटाला विसरा व चंद्राकडे पहा. बोटाला पकडून राहू नका, बोटाचे दोष काढू नका. कथेला पकडा तिचा आत्मा शोधा.
कथेमध्ये हेच सौंदर्य आहे. जेव्हा तुम्ही कथा एकत असता तेव्हा तुम्ही ती ध्यानपुर्वक ऐकता कारण तुमची उत्सुकता जागविली जाते. "पुढे काय होणार?" हे ऐकण्य़ासाठी तुमचे कान टवकारले जातात. तुम्ही गुंग होता, आतूर होता, ग्रहणशील होता. तुम्ही आपेक्षेने भरुन जाता, "पुढे काय होणार?". कथा रहस्यमय वातावरण निर्माण करते. ती शिखराकडे जात असते आणि अचानक कथेचा गाभा समोर येतो. कथेचा निष्कर्ष समोर येतो. अशाप्रकारे अचानक निष्कर्षापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही एकदम उद्यपित होता आणि कथेचा निष्कर्ष तुमच्या ह्र्दयापर्यंत पोहोचतो.
सत्य, आध्यात्म यांच्याविषयी काही सांगणे सोपे नाही. त्यासाठी कथा, कविता आणि कांही इतर मार्ग शोधावे लागतात म्हणजेच ऐकणारा ऐकता ऐकता उत्कंठीत होईल, ग्रहणशील होईल आणि जे होणार आहे त्यासाठी प्रतिक्षारत होईल.
आणि फक्त मीच (ओशो) नाही की जो कथांचा वापर करतो तर असे खुप पुर्वीपासून होत आले आहे. बुध्द, चांगत्सू, ख्रिस्त या सर्वांनी कथांचा वापर ध्यानविधीसारखा केला आहे. युगायुगांपासून कथांचा वापर उपयोगी ठरलेला आहे आणि भविष्यातही तो ठरेल.
कथा म्हणजे केवळ चुटका नाही. कथा तुमचे केवळ मनोरंजन करत नाही तर ती मनोभंजन करते. कथेच्या आत एक संदेश दडलेला असतो तो तुम्हाला शोधायचा आहे. कधी कधी कथेचे अंतरंग समजण्यासाठी पुर्ण जीवन लागेल. पण कथेचे अंतरंग उघडता उघडता तुम्ही रुपांतरीत व्हाल.
- ओशो ( दि सोक्रेट ऑफ सिक्रेटस)

No comments:

Post a Comment

प्रतिक्रिया