ख्रिश्चन हा आपल्या हिंदू धर्मासारखा सरळ आणि साधा धर्म नाही.
त्यातून कॅथॉलीक ख्रिश्चन हा तर आचरावयास खुपच कठीन धर्म म्हणावा लागेल.
आपल्या हिंदू धर्मात करण्यासारखं ’असं’ खुप कमीच असतं. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव हे सगळे सण समारंभ. ते साजरे करणे म्हणजे धर्माचरण करणे असं आम्हाला वाटतं. पण तसे काही नाही. धर्म ह्या शब्दाची व्याप्ती खुप मोठी आहे. ख्रिस्तांच्या धर्मात करण्यासारखे खुप कांही असते. हा धर्म जरा इव्हेंटप्रिय असावा. आणि त्यांना असं कांही केल्याशिवाय आपण धार्मिक आहोत असं वाटत देखील नसावं. दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करा. फादरसमोर कंफेशन करा (त्याअगोदर थोडीफार पापं करा) दुस-यावर प्रेम करा. शेजा-यांवर प्रेम करा. गरीबांना मदत करा. (जमलंतर त्यांना धर्मांतर करायला भाग पाडा) इ.इ.
नित्से म्हणतो की हे ख्रिश्चन लोक शेजा-यावर प्रेम करतात कारण त्यांना स्वत:ला स्वर्गात पोहोचायचे असते आणि पापी शेजा-यांना नरकात यातना भोगताना पहायचे असते.
"पाप" वरून आठवलं.
एकदा एका शाळेत लहान मुलांना ख्रिश्चन धर्माविषयी माहीती दिली जात होती. कार्यक्रमाच्या शेवटी त्या नननी विचारले," सांगा पाहू कोणाकोणाला स्वर्गात जायचे आहे?"
बहूतेक सर्व मुलांनी हात वर केले मात्र एका मुलीने केला नाही. तीला विचारले तेव्हा ती म्हणाली," मम्मीने मला शाळा सुटल्यावर दुसरीकडे कुठे न जाता सरळ घरी ये असं सांगीतलं आहे."
मुलं किती सरळमार्गी असतात नाही?.
त्या ननने पुढचा प्रश्न विचारला," सांगा बरे मुलांनो, स्वर्गात जाण्यासाठी अगोदर काय केले पाहीजे?"
" पाप" एका मुलीने उत्तर दिले.
ती मुलगी पुढे म्हणाली" कारण, पाप केल्यानंतर आपण जेव्हा प्रभूची क्षमा मागतो तेव्हाच आपल्याला स्वर्गाचा दरवाजा उघडतो."
लहान मुले प्रत्तेक गोष्ट सरळ सरळ पाहतात. लहान मुलांना आपल्यासारखे "अनुभव" नसतात व "ज्ञान" कमी असते, त्यामूळे ते पुर्वानुमानाने किंवा पुर्वग्रहाने कोणतीही गोष्ट पहात नाहीत.
हां एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे ’पाप’ म्हणजे काय हे त्यांना इतक्यात कळत नाही. ते कळण्यासाठी त्यांना थोडे मोठे व्हावे
लागते.
"पाप" वरून आणखी एक कथा आठवली.
एकदा एका ख्रिश्चन पाद्र्याची (फादरची) सायकल हरवलेली असते.
आपली सायकल हरवल्यामुळे ते खूप बचैन झाले होते. सायकलीमुळे त्यांची कामे वेळेवर व्हायची.
आज रविवार त्यांना सायंकाळच्या प्रार्थनेसाठी वेळेवर पोहोचायचे होते. म्हणून ते घाईघाईने चालत जात होते. चालता चालता सायकल चोराला दुषणे देत होते. एका फादरची सायकल चोरायची म्हणजे काय?
आज प्रार्थनेनंतरच्या प्रवचनादरम्यान आपण पाप-पुण्य इ. विषयी चांगले भाषण ठोकायचे असे त्यांनी ठरविले. आपले भाषण ऐकून त्या चोराला आपल्या अपकृत्याची आठवण होऊन त्याने आपली सायकल परत करावी असा त्यामागे हेतू होता.
प्रवचनादरम्यान ते पाप-पुण्य, चोरी, सत्य-असत्य, प्रेम-इर्षा असे करत करत ते व्यभिचार-वेश्यागमनपर्यंत आले. वेश्यागमन, परस्त्रीगमन या शब्दांनंतर ते एकदम थांबले, त्यांना आठवले की त्या रात्री त्यांची सायकल नेमकी कोठे विसरली होती.
त्यांनी प्रवचन संपवले. ते चर्चबाहेर पडले आणि तडक चालू लागले.
(मी या कथा कोठेतरी वाचल्या आहेत. कोठे? ते नक्की आठवत नाही.)
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया